Save trees on Wai to Surur Road

प्रती:

मा. ना. मकरंद पाटील

आमदार, वाई विधानसभा मतदार संघ

आणि मा. मंत्री, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य

वाई

ता: २७ एप्रिल २०२५

 

विषय: वाई-सुरुर रस्त्यावर होणार असलेली वृक्षतोड

 

महोदय,

सविनय नमस्कार. खाली सही करणारे आम्ही आपल्या विधानसभा मतदार संघातील नागरिक आहोत. गेली अनेक वर्षे आपण आमचे लोक प्रतिनिधीआहात. लोक प्रतिनिधी ह्या नात्याने आपण ह्या मतदार संघातील विविध प्रश्नाचा सातत्त्याने पाठपुरावा केला आहात आणि अनेक समस्या सोडविण्यात आपण पुढाकार घेतला आहे. ह्या बद्दल आम्ही नागरिक म्हणून आपले आभारी आहोत.

सध्या सुरूर ते वाई ह्या रस्त्याचे रुंदीकरण सुरु आहे. आमचा रुंदीकरणाला विरोध नाही. परंतु पुढील दोन मुद्दे लक्षात घेऊनच रुंदीकरण केले जावे अशी आमची आग्रहाची मागणी आहे.

1. रस्ता रुंदिकरणात ५४ मोठे वृक्ष प्रत्यारोपण करण्यासाठी हलविले जाणार आहेत. वृक्ष आहेत तेथे ठेवूनच रस्त्याचे रुंदीकरण व्हावे हि आमची मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून तापमान वाढते आहे.आत्ताच रस्त्यावरचे तापमान असह्य होत आहे. आम्ही सुरूर ते वाई रस्त्यावरचे तापमान सकाळी ९.३० ते ११.३० ह्या वेळेत मोजले. तेंव्हावाई शहरात रस्त्यावरचे तापमान ११.३० वाजता ४८ अंश सेल्शियसइतके भरले. वेध शाळेतील अंदाजापेक्षा रस्त्यावरचे तापमान नेहमीच ५ ते १० अंश अधिक असते. ह्याला रस्त्याच्या पृष्ठ भागावरून येणारीउष्णता, शेजारील इमारतीनी परावर्तीत केलेली उष्णता आणि वाहनातून निघणारी उष्णता जबाबदार असतात. सध्या वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या पुरातन वृक्षांनी रस्त्यावर थोडा गारवा असतो, पणहि झाडे गेली कि रत्यावर ४८ अंश ते ५० अंश तापमान सहज होईल.

ह्या रस्त्याचा वापर बहुतेक स्थनिक लोक दुचाकी वाहने, वातानुकुलीतनसलेली सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहने किंवा पायी चालत जाण्यासाठी करतात. तसेच रस्त्याच्या बाजूला व्यावसायिक झाडाच्या सावलीत विविध उद्योग करतात. झाडे गेली तर वातानुकीलुत वाहनातून प्रवास करणाऱ्या मोजक्या प्रवाशांची सोय होईल परंतु रस्त्यावरीलप्रचंड  तापमानामुळे रस्त्याचा वापर करणाऱ्या  ७०% ते ८०% स्थानिकलोकांचे नुकसान होईल. त्याना भयंकर उष्म्याचा असह्य त्रास होईल.जीवितहानी सुद्धा होऊ शकते. आता पर्यंत ह्या रस्त्यावर मोठा ट्राफिकज्याम सहसा होत नाही. ह्या पुढे भविष्यात वाहतुक वाढल्या मुळे रस्त्याची गरज जशी वाढेल तसेच तापमान पण वाढणार आहे. त्यातूनसावलीची गरज सुद्धा वाढणार आहे.

जुने वृक्ष प्रत्यारोपित करून वृक्ष एखाद्या वेळेस वाचू शकतील पण रस्त्यावर सावली मिळणार नाही.

त्याच बरोबर हे हि लक्षात घ्यायला हवे कि सुरूर-वाई रस्त्यावरील वृक्षराजी आणि घनदाट सावली हे त्या रस्त्याचे वैभव आहे. हा रस्ता फार सुंदर आहेच पण वृक्ष सभोवतालच्या परीसंस्थेसाठी फार महत्वाचे सुद्धा आहेत. वृक्षतोड झाल्यास सभोवतालच्या शेतातून भूजल पातळी घटण्याचा धोका आहे शिवाय परीसंस्थेसाठी आवश्यक असलेल्या पक्षी आणि कीटकांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे होणारे वाईटपरिणाम सुद्धा स्थानिकाना भोगावे लागतील. महाराष्ट्रात तापमान वाढीमुळे उसाचे दर हेक्टरी उत्पादन जवळ जवळ २० टन इतके घटले आहे. इतर पिकांवर सुद्धा वाईट परिणाम झाला आहे.  

ह्याचाच अर्थ वृक्ष हटविल्यास पाचगणी महाबळेश्वर ला वातानुकुलीत गाड्यातून  जाणाऱ्या श्रीमंत पर्यटकांचा फायदा होईलही कदाचित, पणआपल्या मतदार संघातील सामान्य लोकांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. हे वैभव  कायम स्वरूपी टिकले पाहिजे आणित्याचे योजनापूर्वक संवर्धन झाले पाहिजे. ह्या रस्त्यावरील वृक्ष  न तोडता वृक्षाखालील जागा बचत गट, लहान उद्योजक ह्याना रोजगारासाठी देता येईल. पर्यटकाना आकर्षित करेल अश्या प्रकारे हे केल्यास स्थानिकांचा फायदा तर होईलच परंतु एक सुंदर पायंडा सुद्धा पडता येईल. म्हणून रस्ता रुंदी करायची असल्यास कोणत्याही वृक्षाला अजिबात धक्का न लावता करावी हि आमची मागणी आहे. हे शक्य नसल्यास रस्ता रुंदी करू नये.स्थानिक नागरिकाना रस्ता रुंदीचे फायदे जितके आहेत त्या पेक्षा तोटे जास्त आहेत.

2. दुसरा मुद्दा असा आहे हि रस्ता रुंदी करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा मुद्दाम ठरवून म्हणा, काम करताना जी झाडे हालवायची नाहीयेत अश्या झाडांची मुळे खीळखिळी करण्यात आली आहेत. ह्या मुळे आतापर्यंत दोन महाकाय वृक्ष कोसळले. सोसाट्याचावारा किंवा वळवाचा पाउस आला तर अधिक वृक्ष कोसळू शकतात.ह्यातून पर्यावरणाची तर हानी होतेच पण जीवित हानी सुद्धा होऊशकते. ह्या साठी अश्या वृक्षांचे तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली त्याच जागी मजबुतीकरण करावे लागणार आहे. हे काम जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत रस्ता वापरास धोकादायक झाला आहे. त्यामुळे सध्यासुरु असलेले काम त्वरित थांबवून सर्व वृक्षांचे त्याच ठिकाणी मजबुतीकरण करावे आणि मजबुतीकरणाचे काम संपल्याशिवायपुढचे काम होऊ देऊ नये तसेच रस्ता वाहतुकीला खुला करू नये हिआमची दुसरी मागणी आहे.

 

     आपण आमच्या वरील मागण्याना सकारात्मक प्रतिसाद द्याल ह्याचीआम्हाला खात्री आहे.        आपल्या मतदार संघाचा पर्यावरण टिकवून आणि संवर्धित करून विकास करण्याच्या  कोणत्याही कार्यक्रमात आम्ही आपल्या सोबत असू हि खात्री बाळगावी. त्याच बरोबर पर्यावरण नष्ट होणार नाही ह्यासाठी सुद्धा आम्ही बांधील आहोत. आपण आमचे लोक प्रतिनिधीम्हणून आम्हाला साथ द्याल आणि आमच्या ह्या मागण्या योग्य त्या मंचावर नेऊन पूर्ण कराल असा आमचा विश्वास आहे.

आपले नम्र

वाई तालुक्यातील नागरिक

 

 

 

Sign this Petition

By signing, I accept that Neeraj hatekar will be able to see all the information I provide on this form.

We will not display this information publicly online.


We need to check that you are human.

I give consent to process the information I provide on this form for the following purposes:




Paid advertising

We will advertise this petition to 3000 people.

Learn more...