सुरुर वाई रस्त्यावरील वृक्ष हटवू नयेत
प्रती:
श्री . छत्रपती शिवेंद्र राजे भोसले
मा. मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग
महाराष्ट्र राज्य
ता: ४ मे २०२५
विषय: वाई-सुरुर रस्त्यावर होणार असलेली वृक्षतोड
महोदय,
सविनय नमस्कार. खाली सही करणारे आम्ही महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत.
सध्या सुरूर ते वाई ह्या रस्त्याचे रुंदीकरण सुरु आहे. आमचा रुंदीकरणाला विरोध नाही. परंतु पुढील दोन मुद्दे लक्षात घेऊनच रुंदीकरण केले जावे अशी आमची आग्रहाची मागणी आहे.
ह्या रस्त्याचा वापर बहुतेक स्थनिक लोक दुचाकी वाहने, वातानुकुलीतनसलेली सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहने किंवा पायी चालत जाण्यासाठी करतात. तसेच रस्त्याच्या बाजूला व्यावसायिक झाडाच्या सावलीत विविध उद्योग करतात. झाडे गेली तर वातानुकीलुत वाहनातून प्रवास करणाऱ्या मोजक्या प्रवाशांची सोय होईल परंतु रस्त्यावरीलप्रचंड तापमानामुळे रस्त्याचा वापर करणाऱ्या ७०% ते ८०% स्थानिकलोकांचे नुकसान होईल. त्याना भयंकर उष्म्याचा असह्य त्रास होईल.जीवितहानी सुद्धा होऊ शकते. आता पर्यंत ह्या रस्त्यावर मोठा ट्राफिकज्याम सहसा होत नाही. ह्या पुढे भविष्यात वाहतुक वाढल्या मुळे रस्त्याची गरज जशी वाढेल तसेच तापमान पण वाढणार आहे. त्यातूनसावलीची गरज सुद्धा वाढणार आहे.
जुने वृक्ष प्रत्यारोपित करून वृक्ष एखाद्या वेळेस वाचू शकतील पण रस्त्यावर सावली मिळणार नाही.
त्याच बरोबर हे हि लक्षात घ्यायला हवे कि सुरूर-वाई रस्त्यावरील वृक्षराजी आणि घनदाट सावली हे त्या रस्त्याचे वैभव आहे. हा रस्ता फार सुंदर आहेच पण वृक्ष सभोवतालच्या परीसंस्थेसाठी फार महत्वाचे सुद्धा आहेत. वृक्षतोड झाल्यास सभोवतालच्या शेतातून भूजल पातळी घटण्याचा धोका आहे शिवाय परीसंस्थेसाठी आवश्यक असलेल्या पक्षी आणि कीटकांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे होणारे वाईटपरिणाम सुद्धा स्थानिकाना भोगावे लागतील. महाराष्ट्रात तापमान वाढीमुळे उसाचे दर हेक्टरी उत्पादन जवळ जवळ २० टन इतके घटले आहे. इतर पिकांवर सुद्धा वाईट परिणाम झाला आहे.
ह्याचाच अर्थ वृक्ष हटविल्यास पाचगणी महाबळेश्वर ला वातानुकुलीत गाड्यातून जाणाऱ्या श्रीमंत पर्यटकांचा फायदा होईलही कदाचित, पणआपल्या मतदार संघातील सामान्य लोकांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. हे वैभव कायम स्वरूपी टिकले पाहिजे आणित्याचे योजनापूर्वक संवर्धन झाले पाहिजे. ह्या रस्त्यावरील वृक्ष न तोडता वृक्षाखालील जागा बचत गट, लहान उद्योजक ह्याना रोजगारासाठी देता येईल. पर्यटकाना आकर्षित करेल अश्या प्रकारे हे केल्यास स्थानिकांचा फायदा तर होईलच परंतु एक सुंदर पायंडा सुद्धा पडता येईल. म्हणून रस्ता रुंदी करायची असल्यास कोणत्याही वृक्षाला अजिबात धक्का न लावता करावी हि आमची मागणी आहे. हे शक्य नसल्यास रस्ता रुंदी करू नये.स्थानिक नागरिकाना रस्ता रुंदीचे फायदे जितके आहेत त्या पेक्षा तोटे जास्त आहेत.
आपण आमच्या वरील मागण्याना सकारात्मक प्रतिसाद द्याल ह्याचीआम्हाला खात्री आहे. आपल्या राज्याचा पर्यावरण टिकवून आणि संवर्धित करून विकास करण्याच्या कोणत्याही कार्यक्रमात आम्ही आपल्या सोबत असू हि खात्री बाळगावी. त्याच बरोबर पर्यावरण नष्ट होणार नाही ह्यासाठी सुद्धा आम्ही बांधील आहोत. आपण आमचे लोक प्रतिनिधीम्हणून आम्हाला साथ द्याल आणि आमच्या ह्या मागण्या योग्य त्या मंचावर नेऊन पूर्ण कराल असा आमचा विश्वास आहे.
आपले नम्र
पर्यावरण प्रेमी naagrik
Neeraj Hatekar Contact the author of the petition